Honda Sales Report : : होंडा मोटारसायकल इंडिया कडुन बाजारात आणली जाणारी स्कुटर प्रकारातील सर्वात ताकदवान आणि देशातील सर्वात जास्त विकणारी स्कुटर होंडा Activa बरोबरच त्यांच्या इतर गाडयांच्या विक्रीचा तपशीलही सादर करण्यात आला आहे. ज्याला पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल. होंडा एक्टिवा प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वात जास्त विकणा-या स्कुटरच्या श्रेणीत वर्ग करण्यात आली आहे.
होंडा Activa च्या विक्रीमध्ये सलग वर्ष प्रतिवर्षी वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. आज आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये होंडाच्या 5 गाडयांचे विक्री रिपोर्ट पाहणार आहोत ज्यामध्ये Activa, CB Shine, Shine 100, Duo आणि Unicorn या गाडीचा समावेश आहे. याबाबत आम्ही आपल्याला खाली सविस्तर माहिती देणार आहोत.
होंडा मोटारसायकल कंपनीने बाजारामध्ये या नोव्हेंबर मध्ये वार्षिक 18.98 टक्क्यांनी वाढ झाली असुन एकुण 4 लाख 20 हजार 648 गाडयांची विक्री केली आहे. जे की मागचे वर्ष 2022 मध्ये एकुण 3 लाख 53 हजार 553 गाडयांची विक्री केली होती. दोन्ही वर्षांचा विचार करता या वर्षी एकुण 67 हजार 95 गाडयांची अधिक विक्री झाल्याचे कंपनीने सांगितले.
Honda Sales Report Honda Activa
होंडा कंपनीने याबाबत सांगितले की, सर्वात जास्त विक्री होंडा Activa Honda ची झालेली असुन या वर्षी होंडा एक्टिवा ने नाव्हेंबर 2023 मध्ये एकुण 1 लाख 96 हजार 55 गाडयांची विक्री केली होती.
जी मागील वर्ष 2022 च्या तुलनेत 1 लाख 75 हजार 84 गाडयांची विक्री केली होती. या दोन्ही वर्षांच्या गाडयांच्या विक्रीच्या तुलनेत या वर्षी 29 हजार 971 गाडयांची अधिक विक्रीची नोंद करण्यात आली आहे. या विक्रीबरोबरच होंडा एक्टिवा ने 11.1 टक्क्यांनी विक्रीत वाढ केल्याचे नोंद आहे. ज्याचा बाजारातील एकुण प्रमाण अथवा हिस्सेदारी जवळजवळ 46.61 टक्के आहे. याबरोबरच होंडा एक्टिवा प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षीही जास्त विक्री करणारी दोन चाकी स्कुटर सेगमेंट मधील आपले वर्चस्व राखण्यात यशस्वी झालेली आहे.
Honda Sales Report CB Shine
त्यातच दुस-या क्रमांकावर होंडाची सीबी शाईन ही गाडी आहे. जी मागच्या वर्षीची विक्री 1 लाख 14 हजार 965 गाडयांच्या तुलनेत यावर्षी झालेली विक्री 1 लाख 28 हजार 969 असुन या दोन्ही गाडयांची सरासरी काढल्यास यावर्षी 14 हजार गाडयांच्या विक्रीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आणि तिची 12.18 टक्के या प्रमाणात वाढ झाली आहे आणि यात बाजारातील एकुण हिस्सेदारी अथवा प्रमाण हे जवळजवळ 30.66 टक्के इतके आहे.
Honda Sales Report Shine 100
होंडाची ही गाडी विक्रीच्या तिस-या नंबरवर आहे आणि ती साईन 100 ही होय. या वर्षी या गाडीने चांगली विक्री करत नोव्हेंबर मध्ये एकुण 26 हजार 974 गाडयांची विक्रीची नोंद केली आहे.
Honda Sales Report Honda Dio
होंडा ही गाडी विक्रीच्या बाबतीत चार क्रमांकावर आहे. Honda Dio या गाडीला नुकतेच भारतीय बाजारात आणण्यात आले आहे. या गाडयाच्या विक्रीमध्ये मागच्या वर्षी 2022 मध्ये एकुण 16 हजार 102 गाडयांची विक्री नोंद होती ती या वर्षी 2023 मध्ये एकुण 23 हजार 979 गाडयांची विक्री झालेली आहे. म्हणजेच त्यामध्ये एकुण 7 हजार 877 गाडयांच्या विक्रीची नोंद झालेली आहे. तर विक्रीच्या प्रमाणात 48.93 टक्के वाढ झालेली आहे
Honda Sales Report Honda Unicorn
होंडाची ही गाडी या सेगमेंट मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. होंडा युनिकॉर्न ची या मागच्या वर्षीची विक्री ही एकुण 28 हजार 729 गाडयांची होती जी की चालु वर्ष 2023 मध्ये एकुण विक्री 20 हजार 146 झालेली आहे. जी मागच्या वर्षीच्या तुलनेत 8 हजार 583 गाडयांची विक्री कमी झालेली आहे. याबरेबरच या गाडीच्या विक्रीमध्ये एकुण 29.99 टक्क्यांची उतरण दिसत आहे.