Hero Splendor Plus Offer : हिरो कंपनी ही भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आहे. ज्यामध्ये हिरो या विभागात विकली जाणारी मोटारसायकलचे नांव घेतल्यास हिरो स्प्लेंन्डर प्लस हे नांव समोर येते. ही आपल्या नव्या लुकबरोबरच ग्राहकांच्या राज्यात धुमाकुळ घातलेला आहे. जर आपण पण हिरो स्प्लेंन्डर घेण्याचा विचार करत आहात तर ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी होणार आहे कारण कंपनी हिरो स्प्लेंन्डर प्लस वर धमाकेदार ऑफर देत आहे. ज्याबाबत आम्ही आपल्याला पुढे सांगणार आहोत.
Hero Splendor Plus on Road Price :
हिरो स्प्लेंन्डर प्लस भारतीय भारतीय बाजारात एकुण 3 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. याचे बेसीक म्हणजे सुरूवातीच्या व्हेरिएंटची किंमत ही 89 हजार 98 रूपये असुन त्यातील टॉप व्हेरिएंटची किंमत 90 हजार 580 रूपये इतकी आहे. यामध्ये कंपनीने सात वेगवेगळया रंगाचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
Hero Splendor Plus :
Hero Splendor Plus Colours Black With Silver, Black with Purple, Black With Sports, Red Heavy Grey With Green, Bumble Bee Yellow, Firefly Golden Silver, Nexus Blue
Hero Splendor Plus Offer :
हिरो कंपनी कडुन या गाडीवर कमी व्याजदरावर ऑफर देण्यात येत आहेत ज्याचा उपयोग करून आपण कमीत कमी व्याजासह कमी ईएमआय वर आपली गाडी खरेदी करू शकता. जर आपण हिरो स्प्लेंन्डर प्लस गाडीचे 30 हजार रूपयांचे डाउन पेमेंट केले तर 12 टक्के व्याजदराने 3 वर्षाच्या काळात आपल्याला दरमहा फक्त 2233 यपये इतका कमी ईएमआय प्रती महीना जमा करून आपण ही गाडी खरेदी करू शकता. परंतु ही गोष्ट लक्षात घ्या की, ही ऑफर प्रत्येक जिल्हा व राज्याच्या डिलरशिप नुसार वेगवेगळी असु शकते. त्याकरिता अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या डिलरला जाउन एकदा भेटा व चौकशी करा.
Hero Splendor Plus : Hero Splendor Plus Mileage :
हीरो स्प्लेंन्डर प्लस एक अतिशय चांगला मायलेज देणारी गाडी आहे जी कमीत कमी प्रति लिटरला 60 किलोमीटर पर्यंत धमाकेदार मायलेज देते. ही मोटारसायकल i3s स्मार्ट टेक्नॉलॉजीसह बाजारात आणलेली आहे. ज्यामुळे इ्रजिनची कार्यक्षमता वाढलेली आहे. आणि ती जास्त मायलेज देते. या मोटारसायकल मध्ये 90 कि.मी. प्रति तासाचा टॉप स्पीड देण्यात आला आहे. ही मोटारसायकल आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. ज्यामुळे आपण लांब पल्ल्याचा प्रवास कमी करू शकता तेही कमी थकव्यात.
Hero Splendor Plus Features :
या मोटारसायकल मध्ये एनालॉग स्पिडोमीटर आणि एक एनालॉग Fuse गेज, ओडोमीटर, टेकोमीटर देखील दिले आहे. याबरोबरच यातील अन्य फिचर्स जसे की, पार्कींग स्टॅंण्ड अलर्ट वॉर्निंग, ह्रेड लाईटमध्ये हॅलोजन, इंजिन चालु आणि बंद करण्यासाठी स्विच आणि मोबाईल फोन चार्जिंग करण्यासाठी एक युएसबी पोर्टची देखील सुविधा देण्यात आलेली आहे.
Hero Splendor Plus Engine:
हिरो स्प्लेंन्डर प्लस या गाडीच्या इंजिनला ताकद देण्यासाठी यामध्ये 97.2 सीसी चे सिंगल सिलेंडरचे एअर कुल इंजिन सोबत देण्यात आलेले आहे. जे 8000 आरपीएम सह 7.91 बी.एच.पी. च्या शक्तीसह आणि 6000 आरपीएम वर 8.02 एनएम चा पीक टॉर्क तयार करते. या गाडीचे इंजिन हे 4 स्पीड गेअर बॉक्स सह जोडलेले आहे. या गाडीबरोबर आपल्याला 5 वर्षांची वॉरंटी आणि 70 हजार किलोमीटरची स्टॅण्डर्ड वॉरंटी देण्यात आलेली आहे.
Hero Splendor Plus Brakes & Suspension :
Hero Honda Splendor Plus मध्ये टेलिस्कोपिक सस्पेंन्शन पुढच्या बाजुस दिलेले असुन मागच्या बाजुस हायड्रोलिक शॉक अब्सर सस्पेंशनचा सेटअप व्दारा नियंत्रित केले गेले आहे. याचबरोबर ब्रेक साठी कम्बाईन ब्रेकींग सिस्टीम सीबीएस सिस्टीम ज्याव्दारे दोन्ही टायर ड्रम ब्रेकने नियंत्रित केले आहेत.