Honda Activa
भारतातील सर्वात जास्त विकणारी गाडी आहे. जिला आपण नव्या वर्षाच्या सुरूवातीला एकदम स्वस्त EMI Plan वर आपल्या घरी खरेदी करून नेउ शकता. Honda Activa ही होंडा कंपनीची एक सर्वात जास्त चालणारी अशी गाडी आहे. ज्यात तुम्हाला 125 सीसी चे पावरफुल इंजिन आणि एकदम स्टायलिश लुक तसेच मजबुत माइलेज सह मिळत आहे. आज आम्ही आपल्याला Activa गाडीच्या EMI Plan घेउन आलो आहोत. जेणेकरून आपण त्याच्या मदतीने कमी ईएमआयवर घरी घेउन जाउ शकता. त्याबरोबरच या गाडीची किंमत, फिचर्स आणि इतर माहिती सविस्तरपणे खाली सांगण्यात आली आहे.
Honda activa Price
होंडा Activa भारतात सर्वसाधारणपणे 6 प्रकारात उपलब्ध आहे. जसे की, Standard, Deluxe, Deluxe-Limited Edition, H-smart, आणि H-Smart-Limited Edition हे प्रकार आहेत. होंडा Activa स्टॅण्डर्ड ची किंमत आहे 89843 रूपये तर होंडा Activa डिलक्स ची किंमत आहे 92573 रूपये, एक्टिवा डिलक्स लिमिटेड एडिशन याची किंमत आहे 94755 तर एक्टिवा H स्मार्ट ची किंमत आहे 96393 रूपये तर त्याच लिमिटेड एडिशनची किंमत ही 96939 आहे. या सर्व किंमती प्रत्येक राज्याच्या ऑनरोड प्राईज वेगवेगळया आहेत.
Honda Activa Honda Activa EMI Plan
या नववर्षात होंडा कंपनी या गाडीवर धमाकेदार ऑफर देत आहे. ज्यामध्ये कमीत कमी व्याजदर 9.99 टक्के डाउन पेमेंट सह 5000 च्या कॅशबॅक डिस्काउंटसह देत आहे. जर आपण या गाडीचे 30 हजार रूपयांचे डाउन पेमेंट देउन खरेदी करू इच्छिता तर आपल्याला फक्त 9.99 टक्के व्याजदरासह 3 वर्षासाठी महिन्याचा हप्ता Monthly EMI Plan हा फक्त 2156 रूपये इतकाच असेल. मात्र याकरिता हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, हा जो Monthly EMI Plan आहे तो प्रत्येक शहर आणि राज्याकरिता वेगवेगळा वेगळा असु शकतो. याबददल अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या डिलरशी चर्चा करू शकता.
Honda Activa Mileage
होंडा Activa 6G ही गाडी ब्ल्यु रेड, यलो ब्लॅक, पांढ-या रंगात, ग्रे कलर मध्येही उपलब्ध आहे. होंडा Activa 6G एक चांगली Average देणारी स्कुटर म्हणुन ओळखली जाते. ज्यात 45 ते 50 किलोमीटर प्रत्येक लिटरमध्ये Average मिळत आहे. यामध्ये 5.3 लिटरचे इंधन क्षमतेचे इंजिन असुन या गाडीचे वजन 106 किलोचे आहे.
Honda Activa Honda Activa Features
होंडा Activa 6G मध्ये एक गाडी चालु किंवा बंद करण्यासाठी एक बटण देण्यात आले असुन एक डयुल फंक्शनसह बटण देण्यात आले आहे ज्याव्दारे आपण सीटही उघडु शकतो आणि बाहेरील टॅंक देखील उघडु शकतो. याशिवाय या गाडीत एक एनालॉग स्पीडोमीटर, एनालॉग Fuel गेज मीटर मिळत आहे. याच्या इतर फिचरमध्ये दोन्ही बाजुंचे इंडिकेटर, टेकोमीटर, एलईडी हैडलाइट इंडिकेटर आणि इतर सुविधा दिल्या गेल्या आहेत. यामध्ये एक नवीन स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने स्कुटी पार्किंग बाबत माहिती, चावीशिवाय हॅंडललॉक व अनलॉक, सीटच्या खालील मोकळया जागेचा देखील विना चावीने उघडता येउ शकेल अशा सुविधेसह चोरी होणे टाळण्यासाठी Anti Theft सिस्टीम मिळणार आहे.
Honda Activa Engine
होंडा Activa 6G च्या इंजिनबाबत सांगायचे तर या इंजिनमध्ये 109 सीसीचे एक सिंगल सिलेंडर, एअर कुल सुविधेसह देण्यात आली आहे. जी 8000 आरपीएम व 7.73 बीएचपी ची शक्ती देते आणि 5500 आरपीएम वर 8.90nm चा टॉर्क जनरेट करते.
Honda Activa Suspension and Brakes
Honda Activa 6G या गाडीचे हार्डवेअर सस्पेंशनचे काम व्यवस्थित करण्याकरिता पुढील बाजुस टेलीस्कोपिक आणि मागील बाजुस 3 भागात सामाईक सस्पेंशन देण्यात आले आहे. तसेच ब्रेकींग सिस्टीम व्यवस्थीत कार्य करण्याकरिता सीबीएस ब्रेकिंग सिस्टीम देखील दोन्ही चालकांना ड्रम ब्रेक व्दारे जोडण्यात आलेले आहे.
Hero Splendor Plus या नव्या आवृत्तीचा बाजारात 2024 धुमाकूळ…
New Year Offer 2024 Royal Enfield Classic 350 ची नव वर्षात धमाकेदार ऑफर EMI पर घरी घेउन जाता येणार….
TVS Apache RTR 160 4V ची नवीन गाडी, जबरदस्त फिचर्स आणि दमदार इंजिन सोबत घालणार बाजारात धुमाकुळ