Royal Enfield Classic 350 New Year Offer 2024 : जर आपण सर्व नव्या वर्षाची सुरूवातीबरोबर आपल्या घरी एक जबरदस्त गाडी आणण्याचा विचार करत आहात तर हा लेख आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेउन आला आहे.
यावेळी Royal Enfield Classic 350 वर उत्कृष्ठ ऑफर तसेच EMI चे वेगवेगळे प्लॅन कंपनीव्दारा सांगण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये एकदम कमी व्याजदरावर आणि एकदम कमी डाउन पेमेंट सह तुम्हाला ही गाडी घरी नेता येणार आहे. पुढे रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची संपुर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
Royal Enfield Classic 350 On Road Price
रॉयल एनफील्ड क्लासिक Royal Enfield Classic 350 आपल्या मजबुत लुक आणि डॅशिंग दिसण्यामुळे कायम चर्चेत असते आणि ही भारतीय युवकांची एक आवडती गाडी आहे. या गाडीच्या किंमतीबददल चर्चा करायची झाली तर यातील Redditch Single Channel Series ची किंमत 2 लाख 2 हजार एकशे छत्तीस ऑनरोड इतकी सांगण्यात आलेली आहे. या काळात ही गाडी खरेदी केल्यास कंपनी ने खुप फायदे असल्याचे सांगितले आहे. जसे की, एक्सचेंज ऑफर, डिस्काउंट ऑफर, कमीत कमी मासिक हप्ता, यासारख्या ऑफर पाहावयास मिळत आहेत ही गाडी 349 सीसी च्या प्रकारात येणारी एक दिमाखदार गाडी आहे.
Royal Enfield Classic 350 EMI Plan
Royal Enfield Classic 350 या गाडीची मुंबई ऑन रोड किंमत 2 लाख 21 हजार 757 रूपये एवढी आहे. जर आपल्याला ही मजबुत लुकवाली गाडी घेण्याची इच्छा आहे परंतु आपल्या जवळ इतके पैसे नसतील तर आपल्याला सगळयात कमी डाउन पेमेंट ऑप्शनसह आपण ही गाडी खरेदी करू शकता. ज्यामध्ये जर आपण 11000 रूपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर 3 वर्षांकरिता 9.07 टक्के व्याजदराने 6 हजार 411 रूपये प्रति महिन्याच्या ईएमआय वर आपण ही गाडी घरी घेउन जाउ शकता. यामध्ये बॅंकेचे लोणची रक्कम 2 लाख 30 हजार 796 इतकी होईल.
परंतु आपले शहर आणि डिलरशिपच्या आधारावर ही किंमत कमी जास्त होउ शकते त्याकरिता आपल्या जवळच्या डिलरशी संपर्क साधावा.
Royal Enfield Classic 350 Feature :
Royal Enfield Classic 350 मोटारसायकल च्या टॅंक च्या खाली 349 सीसी चे एअर ऑइल कुल 4 इंजीन दिलेले आहे. हे इंजिन 6100 आरपीएम वर 20.02 बीएचपी च्या पावर सह 4000 आरपीएम वर 27एनएम पर्यंत टॉक पावर देते. या गाडीची इंधन कॅपॅसिटी बददल जर विचार केला तर या गाडीचा इंधन टॅंक हा 13 लिटरचा असुन जी 32 किलोमीटर प्रति लिटर चा मायलेज देते.. तसेच या गाडीचे एकुण वजन हे 185 किलोग्रॅम इतके आहे.
Royal Enfield Classic 350 Feature List :
Royal Enfield Classic 350 या गाडीच्या सुविधेबददल पाहायला गेले तर यामध्ये खुप सारे फंक्शन देण्यात आलेले आहेत जसे की, सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीडोमीटर, एनालॉग स्पीडोमीटर, ऑडोमीटर, हलोजन, हेडलाइट, टेल लाइट बल्ब याबरोबरच या गाडीच्या टॉप व्हेरिएंट मध्ये ब्लुटुथ कनेक्टिव्हिटी देखील पहावयास मिळते. याव्यतिरिक्त याबरोबर एक चार्जिंग स्लॉट देखील देण्यात आलेला आहे.
युएसबी चार्जिंग पोर्ट | आहे |
ट्रीप मीटर | अनालोग |
कन्सोल | डिजिटल आणि अनालोग |
इंडिकेटर | आहे |
टायमर घडयाळ | डिजिटल |
ओडोमीटर | डिजिटल |
एअर क्लिनर | पेपर एलिमेंट |
स्पिडोमीटर | एनालॉग |
नेव्हीगेशन | आहे |
सीटचा प्रकार सिंगल | सीटचा प्रकार सिंगल |
Royal Enfield Classic 350 Suspension and Brake :
Royal Enfield Classic 350 या गाडीचे हार्डवेअर आणि सस्पेंशनचे कार्य करण्यासाठी गाडीच्या पुढील बाजुस 41 एमएम टेलीस्कोपिक फोर्क्स सस्पेंन्शन देण्यात आले असुन मागील बाजुस प्रीलोडेड एजडजस्टेबल टवीन शॉक सस्पेंशन चा उपयोग करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त बेक व्यवस्थीत लागावेत याकरिता पुढील बाजुस 300 एमएम चा डिसक ब्रेक आणि मागील बाजुस ड्रम बेक देण्यात आलेले आहेत.