In Year 2024 which 5 Top Points Remember when to Buy Toyota Hyryder Mini Fortuner

Toyota Hybrid वाहनाच्या सेगमेंट मध्ये सतत नवीन येत असलेली वाहने, अत्याधुनिक तंत्रज्ञान यामध्ये Toyota Hyryder ने पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे. ड्रायव्हिंगचा नवा अनुभव देणारी ही गाडी असुन आपल्या Toyota या गाडीशी मिळतीजुळती आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सुरक्षा, वैशिष्टये आणि ग्राहकांच्या एकंदर गरजा लक्षात घेउन कमीत कमी किमतीत टोयोटा किर्लोस्करने ही गाडी भारतीय बाजारात आणली आहे. या गाडीबाबत आपण अधिक तपशीलवार माहिती खाली पाहु.

toyota-hyryder
toyota-hyryder

Toyota Hyryder Price In India :

भारतीय बाजारात कोणतेही नवीन वाहन आणण्याअगोदर विचारात घेण्याजोगे जे मुददे आहेत त्यापैकी एक म्हणजे वाहनाची किंमत. Toyota Hyryder या गाडीची किंमत या सेगमेंटमधील इतर गाडयांच्या तुलनेत अगदी कमी ठेवण्यात आली आहे. त्यातच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि टोयोटा ब्रॅंड यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये तडजोड न करता टोयोटाने या गाडीला भारतीय बाजारात उतरवले आहे.

टोयोटा हाई रायडर ची किंमत भारतीय बाजारात 11.14 लाख रूपयांपासुन सुरू होउन 20.19 लाख रूपयांपर्यत आहे. या किंमती मुंबई एक्स शोरूम असुन वेळोवेळी आपल्या डिलर व शहरानुसार बदलत असतात. टोयोटाने या सेगमेंट मध्ये एकुण चार व्हेरिएंट मध्ये आणले आहे. ई, एस, जी आणि व्ही ही आहेत. सीएनजी सेगमेंट साठी एस आणि जी देण्यात आले आहे.

याबरोबरच टोयोटाने या गाडीचे कलर निवडण्यासाठी एकुण 11 रंगात उपलब्ध करण्यात आली आहे. त्याबाबत अधिक माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

Monotone ColorsDual Tone Colors
Cafe WhiteSporting Red with Midnight Black
Enticing SilverEnticing Silver with Midnight Black
Gaming GreySpeedy Blue with Midnight Black
Sporting RedCafe White with Midnight Black
Midnight Black
Cave Black
Speedy Blue
Toyota Hyryder Table of Content

Toyota Hyryder Features List In India :

टोयोटाने वापरलेले हायब्रीड तंत्रज्ञान :

Toyota ने Hyrder ही गाडी बनवतांनाच ती एका अत्याधुनिक हायब्रीड तंत्रज्ञानामध्ये बनवण्यात आलेली आहे. जे की रेग्युलर इंजिनसारखेच इलेक्ट्रीक मोटारसह जोडण्यात आले आहे. हे फक्त गाडीचे इंधन वाचवत नाही तर गाडी चालविण्याचा एक नवीन अनुभव सुध्दा देते. हायब्रीड तंत्रज्ञान वेगवेगळया ड्रायव्हींग परिस्थितीत जास्तीत जास्त चांगले कार्य करण्यास मदत करते.

ऑडीओ आणि कनेक्टिविटी

आधुनिक आणि उत्कृष्ठ ऑडीओ सिस्टीम कयहासकसयहेक या गाडीत वापरलेली आपणास पहावयास मिळते. डॅशबोर्ड चा लुक एकदम डिसेंट ठेवण्यात आलेला आहे. नेव्हीगेशन असो, गाणी लावणे, मोबाईल कनेक्ट करणे, मनोरंजन किंवा इतर कनेक्टीविटी जोडतांना ती सहजतेने जोडली जावी याचे खास लक्ष ठेवण्यात आले आहे जेणेकरून ड्रायव्हरचे लक्ष ड्रायव्हींग करतांना विचलित होणार नाही.

या गाडीत 9 इंच टच स्क्रीन ऑडीओ सिस्टीम बरोबर डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि वायरलेस Android Auto सोबत Apple कारप्ले कनेक्टिविटीची सोयही मिळणार आहे. इतर फिचर्समध्ये जसे स्मार्टफोन कनेक्टिविटी, एंबिएंट लायटिंग, वायरलेस मोबाईल चार्ज, हेड अप डिस्प्ले, पैनोरमिक सनरूफ, स्मार्ट वॉच कनेक्ट कनेक्टिविटी, एडजेस्टेबल ड्रायव्हर सीटसह एअर सर्क्युलेटेड सीट, आणि Automatic व्हेरीएंट मध्ये पैंडल शिप्टर सुध्दा देण्यात आले आहे. या गाडीत जबरदस्त ऑडीओ सिस्टीम देण्यात आली असुन सीटला लग्जरी प्रेमीयम क्वालिटीचे लेदर वापरण्यात आले आहे.

toyota-hyryder seating arrangement
toyota-hyryder 2024

सीट आणि आसन पध्दत

टोयोटा हायरायडर या गाडीचा आतील भाग खुपच आरामदायी आणि ड्रायव्हिंगचा भन्नाट अनुभव देते. जसे की, गाडीमध्ये वापरलेले उत्कृष्ठ मटेरीअल, सहज व चांगले दिसेल असे आकर्षक डिझाईन आणि सुसज्ज बैठक यामुळे गाडी एक आलिशान केबिनसारखी वाटते आणि ती वाहन चालवणारा चालक आणि त्यातील प्रवासी या दोघांनाही प्रवासाचा आनंद घेउ शकतात मग तो रोज प्रवास असेल किंवा लॉंग ड्राईव्ह.

या गाडीत टोयोटाने पुढील बाजुस ड्रायव्हर सीट Adjustment देण्यात आले आहे ज्याने ड्रायव्हर आपले सीट आपल्या सोयीनुसार वर खाली करू शकतो. तसेच या गाडीत एअर कुल सीटही देण्यात आले आहेत. सीटच्या लेदर देतांना या गाडीत लग्जरी प्रिमिअम क्वालिटीचा वापर करण्यात आल्याचे आपणास पहावयास मिळते.

Toyota Hyryder Safety Features In India :

toyota-hyryder-safety-features
toyota-hyryder-safety-features

ADAS (Advance Driver Assistance System) :

टोयोटा कंपनी नेहमीच आपल्या गाडयांच्या सुरक्षा देण्यामध्ये नेहमीच आघाडीवर असलेली दिसुन येते. त्यातच टोयोटा हायरायडर मध्ये कयेाहकयसहा चा समावेश करून त्यांनी आपल्या ग्राहकांच्या प्रती असलेली दक्षता, काळजी, याचा वारसा सुरू ठेवला आहे. यातील लाईन डिपार्चर वॉर्निंग, क्रुझा कंट्रोल, आणि Automatic इमर्जन्सी ब्रेकिंग या सुविधा रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी एकत्रित कार्य करतात.

Vehicle Structure वाहनाची बांधणी :

टोयोटा हायरायडरचा विचार करता या गाडीमध्ये अत्यंत मजबुत अशा मटेरीअलचा वापर करण्यात आला आहे ज्याने जरी दोन गाडयांची धडक झाल्यास प्रवाशांचे संरक्षण होईल. त्यातच या मटेरीअलमध्ये धडक झालीच तर त्यातील धडकेचा प्रभाव कमी करण्यासाठी क्रंपल झोन आणि रेईनफोर्सड पिलर्सचा वापर या गाडीमध्ये करण्यात आला असुन गाडीमधील प्रवाशांच्या सुरक्षेला नक्कीच प्राधान्य दिले गेलेले आहे.

Hybrid Technology : हायब्रीड तंत्रज्ञान

या गाडीची बांधणी करतांना हायब्रीड तंत्रज्ञान वापरण्यात आल्याने टोयोटा हायरायडर ने हायब्रीड शी कनेक्टेड असणारे घटक यांची सुरक्षेवर जास्त लक्ष देण्यात आले आहे. ही गाडी हायब्रीड बॅटरी आणि त्यासोबत त्याचे नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा राबविण्यात आली आहे. याशिवाय याबाबत हायब्रीड यंत्रणेच्या जे सुरक्षा मानक आहेत त्या चाचण्यांचीही या गाडीमध्ये पुर्तता करण्यात आली आहे.

तर सारांश असा की, सुरक्षा फिचर्सच्या हिशोबाने या गाडीत एकुण सहा एअरबॅग देण्यात आल्या असुन एबीएस सोबतच ईबीडी आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबॅलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टीम, सर्व टायरसाठी डिस्क ब्रेक, 360 डिग्री फिरणारा कॅमेरा, मागील पार्किंग सेंसर आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट एंकर सीट बेल्टसह देण्यात आले आहे.

toyota-hyryder-safety-Engine
toyota-hyryder-safety-Engine

Toyota Hyryder Engine :

या गाडीमध्ये दोन पेट्रोल इंजिन सह चालणारे आणि 1.5 लिटर हायब्रिड इंजीन 103 बीएचपी आणि 137 एनएम चा टॉर्क जनरेट करते. याबरोबरच 1.5 लिटरचे ताकदवान हायब्रीड इंजन जे की 116 बीएचपी चा जास्त पावर जनरेट करते. पहिल्या इंजिन मॉडेलमध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि सहावा अॅटोमॅटीक ट्रान्समिशन सह असुन याव्यतिरिक्त दोन्ही इंजिन मध्ये व्हील ड्रायव्ह तंत्रज्ञान देखील पाहण्यास मिळणार आहे. तसेच आयसीव्हीटी गेअर बॉक्ससह फ्रंट व्हील ड्रायव्ह या मजबुत हायब्रीड इंजिनमध्ये पहायला मिळणार आहे.

Toyota Hyryder Rivals :

टोयोटा हायरायडर ची भारतीय बाजारात स्पर्धा Hyndai Creta, Maruti Grand Vitara, Skoda Kushaq, Kia Seltos, Honda Elevate & Mahindra Scorpio या गाडयांबरोबर होणार हे नक्की.

Conclusion :

जसे आपण पाहिले की, एकंदर टोयोटा हायरायडर हायब्रीड वाहनांच्या स्पर्धेत एक महत्वाची भुमिका घेतलेली आहे. ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान, परवडणारी किंमत आणि त्यातच सुरक्षा यांचा देखील समावेश करण्यात आला. ग्राहकांना गाडीत टाकावे लागणारे इंधन आणि त्याबदल्यात मिळणारे मायलेज आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम या सर्व गोष्टींची जबाबदारी स्विकारत त्यांना अधिकाधिक प्राधान्य देण्यात आल्याचे आपल्याला टोयोटा हायरायडर या गाडीकडे पाहिल्यास लक्षात येते. म्हणुनच टोयोटा हायरायडर एक आकर्षक निवड म्हणुन नांवारूपास आली आहे जिच्यात आराम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान देण्यास तडजोड करण्यात आल्याचे आपल्याला दिसत नाही.

या लेखात आम्ही आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती साधारणतः अधिकृत टोयोटा वेबसाइट च्या संकेतस्थळ व अधिकृत डिलर यांच्याव्दारे घेण्यात आली आहे. तरी आपल्याला टोयाटा हायरायडर बददल अधिक तपशील जाणुन घ्यावयाचा असल्यास टोयोटाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.

Leave a Comment