TVS Apache RTR 160 4V : टीव्हीएस कंपनी तर्फे बाजारात आणली जाणारी जबरदस्त मोटारसायकल अपाचे आरटीआर 160 4व्ही ज्या गाडीने बजाज पल्सर या गाडीला मागे टाकले आहे. यातील एकाहुन एक वरचढ फिचर्स आणि दमदार इंजिन मुळे बजाज पल्सरची पिछेहाट झालेली पहावयास मिळत आहे. आपल्याला सांगायला आवडेल की, टीव्हीएस मोटार ने या गाडीला नुकतीच भारतीय बाजारात आणले आहे.
TVS Apache RTR 160 4V Price :
अपाचे आरटीआर 160 4व्ही भारतीय बाजारात एकुण 5 व्हेरिएंट सह आणि 4 रंगामध्ये उपलब्ध केलेली आहे. टीव्हीएस अपाचे आरअीआर 160 4व्ही मध्ये 159.7 सीसी बीएस6 चे दमदार इंजिन बसविलेले आहे. जे की एक उच्च दर्जाच्या प्रवासाची मजा देते. यातील व्हेरिएंटची किंमत अपाचे आरटीआर 160 4व्ही सिंगल डिस्क एबीएस सह याची किंमत 1 लाख 24 हजार 451 रूपये इतकी आहे. अपाचे आरटीआर 160 4व्ही डयुअल डिस्क एबीएस सह याची किंमत 1 लाख 27 हजार 951 इतकी आहे. अपाचे आरटीआर 160 4व्ही डयुएल डिस्क, एबीएस, ब्लुटुथ 1 लाख 31 हजार 251 व अपाचे आरटीआर 160 4 व्ही स्पेशल एडिशन ही गाडी 1 लाख 32 हजार 751 रूपये इतकी आहे. आणि अपाचे आरटीआर 160 4व्ही डयुएल चॅनल एबीएस 1लाख 37 हजार 695 इतकी आहे.
TVS Apache RTR 160 4V Features:
अपाचे आरटीआर 160 4व्ही मधील फिचर्स मध्ये टीव्हीएस स्मार्ट कनेक्ट व्दारे ब्लुटुथशी कनेक्टीविटी करता येते. यातही आता फुली डिजीटल इंन्स्ट्रुमेंट क्लस्टर ची सुविधा मिळत आहे. तसेच यातील डिजिटल कंट्रोल वर स्पीडोमीटर, टेकामीटर, ट्रिप मीटर, गेअर, पोझीशन, इंधन, सर्व्हिस इंडिकेटर, साईड स्टॅंण्ड अलर्ट, तसेच वेळ पाहण्यासाळी घडयाळ असे वेगवेगळे नवीन फिचर्स मिळत आहे. याशिवाय या गाडीमध्ये कॉल अलर्ट, एमएसएस अलर्ट, ईमेल नोटीफिकेशन तसेच नेव्हीगेशन सिस्टीम सारखे अदययावत फिचर्स देखील देण्यात आलेले आहेत.
TVS Apache RTR 160 4V Design :
अपाचे आरटीआर 160 4व्ही मध्ये एक इतर मोटारसायकलच्या तुलनेत मोठा डे रनिंग लाइट देण्यात आला आहे. तसेच ही गाडी चालविण्याकरिता काही राइड मोड देण्यात आलेले आहेत. जसे की शहरी भागात चालविण्यासाठी, पावसाळयात चालविण्यासाठी आणि स्पोर्ट मोर्ड मध्ये चालविण्यासाठी असे तीन मोड देण्यात आले आहेत. याच्या डिझाईन मध्ये एक नवीन हेडलॅम्प, पिळदार इंधन टॅंक आणि इतर स्टायलिंग उपकरण जोडले आहेत.
TVS Apache RTR 160 4V Engine :
टीव्हीएस Apache आरटीआर 160 4व्ही ला पावर देण्यासाठी या गाडीमध्ये 159.7 सीसी चे सिंगल सिलेंडर 4 वॉल्व्हसह ऑईल कुलसह देण्यात आले आहे. जे 9250 आरपीएम व्दारा 17.39 बीएचपी ची शक्ती आणि 7250 आरपीएम वर 14.73 एनएम चा पीक टॉर्क तयार करते. हे इंजिन पाच स्पीड गिअर बॉक्स व्दारे जोडले गेलेले आहे. या मोटारसायकलचा टॉप स्पीड हा 114 कि.मी. प्रति तास असा आहे.
TVS Apache RTR 160 4V Suspension & Brake:
Apache आरटीआर 160 4व्ही च्या सस्पेंन्शनचा विचार करता या गाडीच्या पुएील भागात टेलीस्कोपिक आणि मागील बाजुस मोनो शॉक व्दारे या गाडीला नियंत्रित केले गेले आहे. त्यातच याची ब्रेकींग सिस्टीम चे कार्य करण्यासाठी यात डयुएल चॅनल एबीएस बरोबर पुढील बाजुस 270एमएम डिस्क आणि मागील बाजुस ड्रम ब्रेक जोडण्यात आले आहेत.